Bhor Breaking l भोरला वरंधा घाटात मुसळधार..! दोन ठिकाणी दरड कोसळली; वाहतूक ठप्प, मुसळधार पावसाचा फटका

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
भोर : प्रतिनिधी 
भोर तालुक्यात मागील दोन दिवस पावसाची संत दार सुरू होती.गुरुवार दि.२ रात्रीपासून जोरदार पावसाने सुरुवात केली असून पाऊस धोतो बरसत आहे.दरम्यान अतिवृष्टीमुळे वरंधा घाटात वारवंड तसेच शिरगाव ता.भोर हद्दीत शुक्रवार दि.३ सकाळी आठच्या दरम्यान दरड कोसळल्याने दोन्ही बाजूंनी रस्त्यावरील वाहतूक बंद झाल्याचे स्थानिककडून सांगण्यात आले.
      यंदा मान्सूनच्या पावसाने सुरुवातीपसून संथ गतीने सुरुवात केली होती.मात्र दोन दिवसांपासून या पावसाला वेग आला असून पाऊस तालुक्यात सर्वदूर जोरदार बरसत आहे.
बहुतांशी भागातील ओढे- नाले खळखळून वाहू लागले आहेत तर धरण क्षेत्राच्या पाणीसाखळीत वाढ झाल्याचे चित्र आहे.दरम्यान सतत सुरू असलेल्या पावसामुळे भोर तालुक्यातील तालुक्यातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या खरीपातील पिकांच्या पेरण्या रखडल्या असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.
स्थानिकांनी संबंधित विभागाला वरंधा घाटात दरड कोसळल्याची माहिती दिली असून संबंधित विभागाचे कर्मचारी यंत्रणेसह लवकरच घटनास्थळी पोहोचून रस्ता मोकळा करणार असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
To Top