Bhor Breaking l शेतातील पाणी पाहण्यासाठी गेलेला शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेला; पान्हवळ येथील घटना

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के 
भोर तालुक्याच्या आंबवडे खोऱ्यातील पान्हवळ ता.भोर येथील शेतकरी आनंदा गणपत(मारुती) कोंढाळकर वय - ७० अतिवृष्टीमुळे शेतात शिरलेले पाणी पाहण्यासाठी पन्हवळ हद्दीतील अंबवडे ओढ्यात गेले असताना अचानक शेताच्या बांधावरून पाय घसरून ओढ्यात कोसळले.
दरम्यान ओढ्याला आलेल्या पुरात शेतकरी आनंदा कोंढाळकर वाहून बुधवार दि.८ गेले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्याबरोबर असणारे चुलत भाऊ सुरेश दिनकर कोंढाळकर यांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र त्यांना यश आली नाही.
       भोर तालुक्यात चार ते पाच दिवसांपासून अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे.शेतात पेरणी केलेले खरिपातील भात पिकाचे रोप अतिवृष्टीमुळे पाण्याखाली गेले आहे की काय तसेच शेतातील पाणी पंप पाण्यात बुडाला आहे की नाही हे पाहण्यासाठी गेलेले शेतकरी आनंदा कोंढाळकर हे शेताच्या बांधावरून चिखलातून पाय घसरून ओढ्यात पडले.दरम्यान ओढ्यातील पुरात ते वाहून गेले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे भाऊ यांनी आरडाओरडा करून शेजारील नागरिकांना जमा केले तसेच त्यानी स्वतः शर्तीचे प्रयत्न केले.मात्र त्यांना पुराच्या पाण्यातून वाहत जाताना वाचवता आले नाही.पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या कोंढाळकर यांना शोधण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून चार ते पाच तासांपासून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले.मात्र अद्यापही कोंढाळकर यांचा तपास लागला नसल्याचे स्थानिकाकडून सांगण्यात आले.
   अतिवृष्टीमुळे ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात शेतकरी वाहून गेल्याची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा संग्राम थोपटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली.स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि ग्रामस्थांच्या मदतीने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली.सध्या तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी, नाले आणि ओढ्यांना मोठा पूर आला आहे. शेतकरी बांधव, तरुणांनी पुराच्या पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या सुरक्षित राहा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा थोपटे यांनी केले आहे.
To Top