सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मेढा : सोमनाथ साखरे
जावली तालुक्यात सलग मुसळधार पाऊस पडत असल्याने तालुक्यात डोंगरमाथ्यावर घरांचे नुकसान होत असून डोंगर खचुन मातीचे ढिगारे वाहून येत आहेत तर रस्त्यावर झाडे पडून रस्त्याची वाहतुक टप्प होत आहे. प्रांताधिकाऱ्यांसह तहसिलदार आदी अधिकारी घटनास्थळी जावुन पहाणी करीत आहेत.
जावली तालुक्यातील म्हाते मुऱ्हा, सायघर, रेंगडीवाडी, टोणपेवाडी, काटवली, बोंडारवाडी, बाहुले आदी गावात घरे पडणे, जमीन खचणे, घरावर झाडे असे प्रकार होवुन नुकसानी झाल्या आहेत. म्हाते मुऱ्हा येथे १६ कुटुंबीयांना स्थलांतर करावे लागले आहे तर काटवली येथे अति पावसामुळे घर पडले असून कुटुंब उघड्यावर पडले आहे.
भालेघर आखाडे रस्त्यावर दरड कोसळली असल्याने वाहतुक बंद झाली आहे. प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसिलदार प्रविण मुदगुल , सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधिर पाटील आणि गटविकास अधिकारी निलेस पाटील तसेच इतर कर्मचारी घटणास्थळी जावुन प्रत्यक्ष पहाणी करीत आहेत.
गरजे शिवाय कोणीही घराबाहेर पडू नये तसेच घाबरून न जाता प्रशसनाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार प्रविण मुदगुल यांनी केले आहे.
