Purandar News | कोडीत शाळेच्या पूर्वा बडधे हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश; तालुक्यातील एकमेव शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुरंदर : प्रतिनिधी 
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोडीत नं. २ येथील विद्यार्थिनी पूर्वा बाळासाहेब बडधे हिने उल्लेखनीय यश संपादन करत पुरंदर तालुक्यातील एकमेव शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान मिळविला आहे.
पूर्वाच्या या यशामागे शाळेतील नियमित सराव चाचण्या, नियोजनबद्ध अभ्यास आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. गुणवंत शिक्षक संजयआबा जाधव, मुख्याध्यापिका व वर्गशिक्षिका प्रतिभा बोत्रे, आदर्श शिक्षक लतिफ इनामदार, तसेच वंदना कामथे, सविता जगताप, संजय कुंभारकर आणि रेणुका म्हस्के यांनी तिला मोलाचे मार्गदर्शन केले.
पूर्वा बडधे हिच्या यशाबद्दल पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी राजशेखर बामणे, विस्तार अधिकारी धनाजी नाझीरकर, केंद्रप्रमुख दीपश्री वाणी, दत्तात्रेय मेमाणे, कोडीत गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पूर्वाच्या या यशामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोडीत नं. २ तसेच संपूर्ण कोडीत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
To Top