सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
अजितदादांच्या जयंतीनिमित्त भोर तालुक्यातील शासकीय कार्यालये तसेच जिल्हा परिषद, माध्यमिक विद्यालयांमध्ये जयंती साजरी केली असतानाच भोर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक निलेश माने यांच्यासह कर्मचाऱ्यांकडून अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
शहरात काही ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.तर भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष,नगरसेवकांनी एसटी बस स्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबविले.
तसेच उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप केली गेली.
