सुपे परगणा I सुपेमध्ये मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सुपे : दिपक जाधव 
 बारामती तालुक्यातील सुपे येथे भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादी विशेष पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
     येथील सरपंच तुषार हिरवे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायात सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रांतधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी निवडणूक नायब तहसिलदार भारत भिसे, मंडलाधिकारी एच. आर. मनाले, ग्रामपांचायत अधिकारी सतीश बोरावके, तलाठी निलेश गद्रे, निवडणूक आयोग प्रतिनिधी सतीश बोरावके, उज्वला चव्हाण, वैशाली कुंभार, मनीषा कुतवळ आदी उपस्थित होते. 
       यावेळी भिसे म्हणाले कि ग्रामस्थांचे मत आबाधित राहावे याकरिता विशेष कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. यासाठी नागरिकांनी येताना आधार कार्ड, जन्मतारीख पुरावा, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, १ पासपोर्ट साईज फोटो घेवुन आपले गणना पत्र भरून द्यावायाचे आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या सूचानेनुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यास संबंधित मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही अशी माहिती भिसे यांनी दिली. 
     यावेळी नवीन मतदार नोंदणी करणे, मयत मतदारांची नावे वगळणे, स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, मतदार तपशील अध्यावत करणे, गणना पत्र भरणे आदी कामे केल्यास आपला मतदानाचा हक्क सुरक्षित राहू शकतो असे भिसे यांनी सांगितले. 
       
To Top