सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : संतोष माने
महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज युवक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी अमोल सुभाष जाधव यांची निवड झाली आहे. अमोल जाधव हे इंदापूर तालुक्यातील डाळज क्रमांक 3 येथील युवा कार्यकर्ते आहेत.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या कैकाडी समाज संघटनेच्या मेळाव्या प्रसंगी अमोल जाधव यांच्या निवडीची घोषणा झाली. महाराष्ट्र राज्य कैकाडी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष एस.एल. गायकवाड यांनी ही निवड जाहीर केली.
अमोल जाधव यांच्या निवडीबद्दल इंदापूर तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. युवा कार्यकर्ते म्हणून इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात त्यांची ओळख आहे.
सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमात त्यांचा सतत सहभाग असतो. रक्तदान शिबिर सारखे उपक्रम त्यांनी अनेक वेळा राबविले आहेत. डाळज परिसरात त्यांची कौतुक होत आहे.
