Indapur News | जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा ध्यास; सुनील कन्हेरकर-पाटील प्रथम श्रेणीत एलएलबी उत्तीर्ण

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
इंदापूर I प्रतिनिधी 
इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथील सुनील कन्हेरकर-पाटील यांनी जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा ध्यास उराशी बाळगत कायद्याच्या शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाशी संलग्न ॲड. बी. डी. हंबर्डे विधी महाविद्यालयातून एलएलबी पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत वकील होण्याचे स्वप्न साकार केले आहे.
सुनील कन्हेरकर-पाटील यांची कौटुंबिक पार्श्वभूमी शिक्षण आणि सहकार क्षेत्राशी निगडित आहे. त्यांचे वडील शिक्षक म्हणून कार्यरत होते आणि सेवानिवृत्तीच्या वेळी मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले. तर चुलते सहकार विभागात अधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र, न्यायव्यवस्थेतून सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांना मदत करण्याची इच्छा सुनील कन्हेरकर-पाटील यांनी लहानपणापासूनच जोपासली.
शेतकरी चळवळीशी असलेल्या जवळच्या संबंधातून समाजातील वंचित, शेतकरी आणि गरजू नागरिकांच्या अडचणी त्यांनी जवळून पाहिल्या. न्यायालयीन प्रक्रियेत सामान्य माणसाला सक्षम कायदेशीर मार्गदर्शनाची गरज लक्षात घेऊन त्यांनी वकिली क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. एलएलबी परीक्षेत प्रथम श्रेणीत यश मिळवल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. शांत, संयमी, मृदुभाषी आणि जनतेशी घट्ट नाळ जोडलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.
यशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुनील कन्हेरकर-पाटील म्हणाले, "गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठीच मी वकील होण्याचा निर्णय घेतला. पुढील काळात समाजातील गरजू आणि वंचित घटकांच्या सेवेला प्राधान्य देत न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार आहे."

समाजसेवेची जाणीव आणि न्यायासाठी काम करण्याची तळमळ यामुळे सुनील कन्हेरकर-पाटील यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
To Top