Indapur News | स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त डाळजच्या शाळेत सायकलींचे वाटप

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
इंदापूर | संतोष माने
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या डाळज येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप, रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा तसेच वृक्षारोपण असे प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या हर्षदा जाधव तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे निमंत्रित सदस्य डी. एन. जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्या हर्षदा जाधव यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी हर्षदा जाधव यांनी स्वखर्चातून ११ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले. तसेच शाळेसाठी ₹२२,००० किमतीचा वॉटर फिल्टर भेट देऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली.
कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य अजित जगताप, संजय जगताप, संजय हगारे, संजय विठ्ठल जगताप, विकास आढाव, किशोर जगताप, गणेश हगारे, शशिकांत सवाने, संजय कुचेकर, किशोर भोसले, विशाल डोईफोडे, संग्राम जगताप यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळाले असून सामाजिक बांधिलकीचा आदर्शही निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
To Top