Khadakwasla Dam | पुणेकरांना दिलासा..! खडकवासला १०० टक्के भरले; मुठा नदीत २७ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुणे : प्रतिनिधी
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे आज, बुधवार (८ जुलै) पहाटे ५.३० वाजल्यापासून खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात २७ हजार २०३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यापूर्वीच्या विसर्गात २२ हजार ८८० क्युसेकने वाढ करण्यात आली आहे.
पावसाचा जोर आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकानुसार हा विसर्ग पुढील काळात कमी अथवा अधिक करण्याची शक्यता असल्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना मुठा नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीकाठावरील जनावरे, शेतीसाहित्य किंवा इतर वस्तू तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन केले आहे. 
             सखल भागातील नागरिकांना सतर्क करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या असून, सर्वांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांनी केले आहे.
To Top