सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
भोर कापूरहोळ मार्गावरून पुणे बाजूकडे जाताना दुचाकीस्वार आळंदे ता.भोर बस स्थानकाच्या शेजारील पुलावरून दुचाकीसह मोठ्या खड्ड्यात कोसळला.दरम्यान या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी स्थानिक नागरिकांनी मदत करीत रुग्णालयात दाखल केले.
भोर तालुक्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस असल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे.
दरम्यान पाऊस सुरू असतानाच दुचाकीस्वार पुणे बाजूकडे जात होते यावेळी जोरदार पावसाचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार पूलाला धडकून पुलावरून खाली कोसळले.
स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून कोसळलेल्या नागरिकाला मोठ्या खड्ड्यातून बाहेर काढले.तर रुग्णवाहिकेची संपर्क साधून जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.
