सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे परिसरात राज्याचे लोकनेते तथा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने रक्तदान शिबीर आणि वृक्षारोपण आदी विविध उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली.
येथील विद्या प्रतिष्ठान संचालित न्यु इंग्लिश स्कुल मधील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत अजितदादांची प्रतिमा तयार करून अनोखे अभिवादन केले. तसेच या परिसरातील सुपे, बाबुर्डी, शेरेचीवाडी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी, वढाणे आणि कुतवळवाडी आदी ग्रामपंचायत, रोटरी क्लब तसेच जिल्हा परिषद शाळा आदी ठिकाणी लोकनेते अजितदादा पवार यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी येथील ग्रामीण रुग्णालयात लोकनेते अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. येथील जिल्हा परिषद सदस्य पल्लवी खेत्रे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना केशर आंब्यांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. तर पानसरेवाडी, शेरेचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना केशर आंब्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पल्लवी खेत्रे, येथील सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच पूजा निकाळाजे, पानसरेवाडीच्या सरपंच नीलिमा पानसरे, काळखैरेवाडीच्या सरपंच नम्रता कुतवळ, कुतवळवाडीच्या सरपंच रूपाली भोसले, बाबुर्डीचे सरपंच दत्तात्रय ढोपरे, प्रमोद खेत्रे, अभिजित पानसरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष अशोक बसाळे, अशोक लोणकर आदी उपस्थित होते.
दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुपे येथील शहाजीराजे सोसायटी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यां शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची प्रतिक्रिया कालवा सल्लागार समितीचे सदस्य पोपट खैरे यांनी दिली.
