सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील ग्रामसचिवालय आवारात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी या शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद दिला.
बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या वतीने सोमवारी ( दि. २० ) फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
यावेळी शिबिरात नागरिकांची रक्तदाब (बीपी), रक्तातील साखर (शुगर) तसेच प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.
याप्रसंगी येथील सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच पुजा निकाळजे, ग्रामपंचायत अधिकारी सतीश बोरावके, तालुका समन्वयक (मूल्यवर्धन) वैभव थोपटे तसेच आशा सेविका वैशाली बारवकर, नैना चौधरी, विद्या बारवकर आणि संध्या सैंदर उपस्थित होत्या.
शिबिराचे नियोजन व अंमलबजावणी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल सरोदे, आरोग्य समन्वयक दत्तात्रय कढणे, यश थोपटे आणि सावली मुळीक यांनी केले.
