Purandar News l निधन वार्ता I प्रा. बाळकृष्ण शिंदे यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुरंदर : प्रतिनिधी 
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, निवृत्त प्राध्यापक तथा संचालक मंडळ सदस्य, नागाव हायस्कूल, नागाव कै. प्रा. बाळकृष्ण सिताराम शिंदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.  
      प्रा. बाळकृष्ण शिंदे यांनी आपल्या प्रदीर्घ अध्यापन कारकिर्दीत असंख्य विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले. अभ्यासू वृत्ती, शिस्तप्रिय स्वभाव, साधेपणा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आत्मीयतेमुळे त्यांनी समाजात मानाचे स्थान मिळविले होते. त्यांच्या निधनाने शैक्षणिक, सामाजिक तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
      त्यांच्या पश्चात पत्नी सौ. भारती शिंदे, मुलगा प्रणव शिंदे, मुलगी प्रांजली शिंदे तसेच इतर आप्तस्वकीय असा परिवार आहे. 
कै. प्रा. बाळकृष्ण शिंदे हे पुणे जिल्हा भाजपा भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष ,उद्योजक बाळासाहेब इटकर यांचे दाजी होत.
To Top