सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वाल्हे : प्रतिनिधी
दौंडज (ता.पुरंदर) म्युझिक कदमवस्ती येथे सोमवारी (दि.२७) सकाळी झालेल्या दुचाकी अपघातात साखरवाडी (ता.फलटण ) येथील २४ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यश हिम्मत पवार (वय २४, रा. सातसर्कल होळ, साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) याचा सोमवारी (दि. २७) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दौडज (ता. पुरंदर) येथे अपघात झाला. अपघातानंतर त्याला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे जेजुरी येथील आयसीयू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सायंकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी सुहास सतीश उंबरे (रा. गोळेगाव, ता. फलटण) यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात खबर दिली असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.
