Baramati Breaking l लोणी भापकर येथे कोयत्याने जीवघेणा हल्ला; चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
लोणी भापकर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील लोणी भापकर (बोरघाट) येथील पोल्ट्री फार्म परिसरात पूर्ववैमनस्यातून एका २८ वर्षीय तरुणावर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश उर्फ सोन्या जालींदर कांबळे (वय २८, रा. लोणी भापकर, ता. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास लोणी भापकर (बोरघाट) येथील पोल्ट्री फार्म परिसरात आरोपींनी लोखंडी कोयत्याने त्यांच्या मान व डोक्यावर वार करून खून करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी अभिषेक तात्या पवार, प्रथमेश जालींदर खोमणे, महेश गणपत भापकर आणि ओंकार उर्फ सोनू राजेश आरडे (सर्व रा. लोणी भापकर, ता. बारामती, जि. पुणे) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, ६१(२), ३५२, ३५१(२), ३(५), अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियमातील संबंधित कलमे तसेच शस्त्र अधिनियमातील कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात फिर्यादी व आरोपी यांच्यातील पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे समोर आले असून, सदर गुन्ह्याचा पुढील तपास बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी करीत आहेत. आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
To Top