Rajgad Breaking l कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडला... पण घरी परतलाच नाही ! विजेच्या धक्क्याने २४ वर्षीय युवकाचा मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
राजगड : मिनल कांबळे 
राजगड तालुक्यातील शिरकोली येथील युवकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश कोंडिबा ढेबे (वय २४, रा. ढेबेवस्ती, शिरकोली, ता. राजगड) हे शुक्रवारी (दि. १०) सकाळी नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये कामासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. 
शोध घेत असताना शिरकोली येथील हॅप्पीलँड हॉटेल
परिसरात प्रकाश हे विद्युत रोहित्रा (डीपी) जवळ बेशुद्धावस्थेत आढळून आले. 
त्यांच्या हाताचा स्पर्श विद्युत रोहित्राच्या फ्यूज बॉक्सला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. नातेवाईक व स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच राजगडचे तहसीलदार निवास ढाणे, महावितरणचे शाखा अभियंता युवराज इंदलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, मयत प्रकाश यांच्या वडिलांचाही तीन वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
To Top