सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
पर्यावरणाचा -समतोल राखण्यासाठी आणि 'हरित राजगड' संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी वनविभाग व ग्रामपंचायत साखर-कोंढवली (ता. राजगड) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेतंर्गत तब्बल २० हजार विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली असल्याची माहिती सरपंच शंकर रेणुसे यांनी दिली
याबाबत अधिक माहिती देताना रेणुसे म्हणाले की वृक्षारोपण मोहिमेमध्ये केवळ शोभेची झाडे न लावता पर्यावरणाला पूरक आणि औषधी गुणधर्म असलेल्या स्थानिक
प्रजातींच्या झाडांवर भर देण्यात आला.
यामध्ये प्रामुख्याने करंज, कांचन, रिठा, आवळा, वावळा, जांभूळ, चिंच, फणस, पेरू यांसारख्या बहुगुणी व फळझाडांचा समावेश आहे.
वृक्षारोपण वनपरिक्षेत्र अधिकारी ए. आर. लांडगे, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आंबवणेचे वन परिमंडळ अधिकारी दया डोमे, गुंजवणेच्या वनरक्षक अर्चना कोरके, साखर गावचे सरपंच शंकर रेणुसे, ग्रामविकास अधिकारी संदेश यादव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ शिक्षक आणि शालेय विद्यार्थ्यां उपस्थित होते. ग्रामपंचायत हद्दीत एक लाख झाडे लावणार असल्याचे सरपंच शंकर रेणुसे यांनी सांगितले.
