सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगाव : प्रतिनिधी
माहेरी गेल्यानंतर कोल्ड्रिंक पाजण्याच्या बाहाण्याने तरुणीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा, तसेच या घटनेचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी ढाकाळे (ता. बारामती) येथील अभिषेक मुकुंदराव जगताप याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला माहेरी यात्रेसाठी गेली असताना आरोपीने कोल्ड्रिंक पिण्याच्या बहाण्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. तसेच, घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास आपल्याकडील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर आरोपीने पीडितेच्या सासरी असलेल्या घरी येऊन धमकीच्या आधारे वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ओमासे करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस नाईक सानप यांनी केली.
