Baramati Crime | मुर्टी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; ६ जणांवर गुन्हा दाखल

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे मुर्टी येथे सुरू असलेल्या तीन पानी पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत आरोपींकडून रोख रक्कम आणि पत्त्यांचे कॅट असा एकूण ४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सहा जणांविरोधात मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे मुर्टी येथे करण्यात आली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी तीन पानी नावाचा पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
या कारवाईत चंद्रकांत यशवंत कुचेकर (वय ५०, रा. मोरगाव), उमेश सत्यवान कांबळे (वय ५४, रा. मोरगाव), संदीप ग्यानबा गायकवाड (वय ४४, रा. मोरगाव), संपत चंदर बालगुडे (वय ५४, रा. मुर्टी), दत्तात्रय पोपट गायकवाड (वय ३३, रा. पणदरे) आणि सुरेश सदाशिव पवार (वय ५२, रा. करंजेपूल) या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी आरोपींकडून जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारी पत्त्यांची दोन कॅट तसेच रोख रक्कम असा एकूण ४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यामध्ये ४ हजार १५० रुपये रोख रक्कम आणि १० रुपये किमतीच्या पत्त्यांच्या दोन कॅटचा समावेश आहे.

या प्रकरणी मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर १६६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक वारुळे करीत आहेत.
To Top