Baramati News l वाघळवाडीच्या सह्याद्री शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रास एम.ए. एज्युकेशन अभ्यासक्रमाची मान्यता

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 
समर्थ ज्ञानपीठ संचलित सह्याद्री शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वाघळवाडी, सोमेश्वरनगर, ता. बारामती, जि. पुणे या संस्थेच्या अभ्यास केंद्रास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या मास्टर ऑफ आर्ट्स इन एज्युकेशन (M.A. Education) या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अध्यापनासाठी मान्यता मिळाली आहे.
या मान्यतेमुळे बारामती तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील कर्मचारी तसेच शिक्षणशास्त्र विषयात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी शैक्षणिक संधी उपलब्ध झाली आहे. नोकरी किंवा व्यवसाय सांभाळून उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे.
शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांना आधुनिक शिक्षणपद्धती, शैक्षणिक व्यवस्थापन, संशोधन, शैक्षणिक नेतृत्व, अध्यापनशास्त्र तसेच शिक्षण क्षेत्रातील बदलते प्रवाह यांचा अभ्यास करण्यासाठी या अभ्यासक्रमाचा लाभ होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातच उच्च शिक्षणाची संधी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रांतर्गत पुढील अभ्यासक्रम उपलब्ध आहेत- 
बॅचलर ऑफ आर्ट्स (B.A.)
डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट
बाल संगोपन व रंजक शिक्षण
मास्टर ऑफ आर्ट्स इन एज्युकेशन (M.A. Education)
समर्थ ज्ञानपीठाच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एम.ए. एज्युकेशन अभ्यासक्रमास मिळालेली मान्यता हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत यांनी सांगितले.

शिक्षणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ घडविणे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे या संस्थेच्या ध्येयाला या मान्यतेमुळे अधिक बळ मिळाले आहे.
To Top