सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या वतीने बारामती तालुक्यातील अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी कृत्रिम हातपाय, कॅलिपर्स व इतर सहायक साधनांचे वितरण करण्यासाठी विशेष 'ऑन द स्पॉट' शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती, बारामती येथे होणार आहे. या शिबिरासाठी एआर ट्रस्ट, मध्यप्रदेश तसेच अलीम्को (ALIMCO), मध्यप्रदेश यांच्या मान्यतेने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये ALIMCO चे अधिकृत फॅब्रिकेटिंग एजन्सी (Authorized Fabricating Agency) तज्ज्ञ उपस्थित राहणार असून, पात्र लाभार्थ्यांचे प्रत्यक्ष मोजमाप घेऊन आवश्यकतेनुसार कृत्रिम हातपाय, कॅलिपर्स व इतर सहाय्यभूत साधनांचे तात्काळ वितरण करण्यात येणार आहे.
या शिबिराचा लाभ केवळ पात्र अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींनाच मिळणार असून, बारामती तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी UDID प्रमाणपत्रासह उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समिती, बारामतीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.
