Bhor News | नेरे शाळेत नवचेतना महिला शेतकरी गटाची परसबाग; विद्यार्थ्यांना मिळणार ताज्या भाज्या

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के 
नेरे शाळेत नवचेतना शेतकरी गटाकडून परसबाग विद्यार्थ्यांना मिळणार जेवणातून ताज्या भाज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेरे ता.भोर येथील विद्यार्थ्यांना दररोज जेवणातून परसबागेतील पालेभाज्या मेळाव्यात या उद्देशाने नवचेतना महिला शेतकरी गटाकडून शाळेत परसबाग तयार करण्यात आली.परसबागेत घेवडा, टोमॅटो, कोथिंबीर, मेथी वाटाणा, मिरची, पावटा अशा वेलवर्गी फळभाज्या लागण केले असल्याचे शेतकरी गटाचे सदस्य रमल सावले, रेश्मा म्हस्के यांनी सांगितले.

       उमेद पाणी फाउंडेशन व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला असून परसबागेत वेगवेगळ्या प्रकारच्या वेलवर्गी भाज्या तयार होणार असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना दररोजच्या जेवणातून ताज्या भाज्या मिळणार आहेत. 

नवचेतना शेतकरी गटाच्या माध्यमातून दहा ते बारा एकर शेती केली जात असतानाच गटातील महिलांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला गेला आहे.गांडूळ खताचा (सेंद्रियखत) उपयोग करून २ गुंठे परसबागेत वेलवर्गी फळभाज्यांची लागण केली गेली आहे.पोषण आहारात परसबागेतील फळभाज्यांचा उपयोग केला जाणार आहे.परसबाग उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक व सहशिक्षिका यांचे मोलाचे सहकारी लाभले.सध्या पावसाळा सुरू असल्याने लवकरच परसबागेतील वेलवर्गी फळभाज्या यांची उगवण होऊन पुढील महिन्यापासून विद्यार्थ्यांना जेवणातून ताज्या भाज्या उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद व्यक्त केला गेला. यावेळी मेघा राऊत,साधना शिंदे,अनिता शेलार, रूपाली सावले,वैशाली मरगजे,वंदना वरे,शारदा सावले,लता सावले उपस्थित होत्या.

शालेय पोषण आहारात ताज्या भाज्या मिळणार 
      जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवचेतना शेतकरी महिला गटाकडून परसबाग तयार करण्यात आले आहे.परसबागेत विविध प्रकारच्या फळभाज्या लावण्यात आल्या असून पुढील एक महिन्यातच या परसबागेतील ताज्या व सेंद्रिय खतावरील भाज्या शालेय पोषण आहारात खाण्यास मिळणार आहेत. आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खायला मिळणार असल्याने आम्ही चिमुकले आनंदी झाले आहोत असे शाळेतील विद्यार्थ्यांनी सांगितले.
Tags
To Top