सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
भिवरी (ता. पुरंदर) येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय विठ्ठल कटके (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली ,सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
ईलिका कंपनीचे कर्मचारी धनंजय कटके ,गृहिणी रोहिणी इंगळे , वाळुंज गावच्या माजी सरपंच योगिता इंगळे यांचे ते वडील होत.
तर पुरंदर शिवसेना उपतालुका प्रमुख व भिवरी गावचे माजी सरपंच संजय दिनकर कटके यांचे ते चुलत बंधू होत.
