पुरंदर I निधन वार्ता l सिताराम पांगारे यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
पुरंदर : प्रतिनिधी 
 पुरंदर दि.१९ वेळू (ता. भोर) येथील जुन्या पिढीतील सिताराम (बाप्पू) विठ्ठल पांगारे ( वय ८८ ) यांचे वृद्धाकाळाने निधन झाले. ते टेल्को कंपनीतील सेवानिवृत्त अधिकारी होते.
 त्यांनी आदर्श महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे वेळू गावचे अध्यक्ष पद ९ वर्ष भूषवले.त्यांच्या काळात महात्मा गांधी तंटामुक्त गाव सुवर्णपदक मिळवण्यास सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनामुळे वेळू गावात शोक कळा पसरली.
    त्यांचे पश्चात पत्नी, तीन विवाहित मुली, एक मुलगा,सून, जावई ,नात, नातवंडे असा परिवार आहे.
       शेतीव्यावसायिक दीपक पांगारे , गृहिणी सरस्वती सुदामराव सावंत, सुशीला विश्वनाथ कामथे , अंगणवाडी सेविका शोभा अशोक जगदाळे यांचे ते वडील होत.
To Top