बारामती l पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी न करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करा; बारामतीत स्मरण पत्र सादर

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती, जिल्हा परिषद शाळा आणि शासकीय आस्थापनांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली नाही, तसेच ज्या ग्रामपंचायतींनी 'अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार' दिला नाही, अशा ठिकाणच्या ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे स्मरण पत्र बारामती पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना (BDO) सादर करण्यात आले.
कोराळे खुर्द (ता. बारामती) ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री. सुरज दत्तात्रय खोमणे यांनी हे पत्र दिले आहे. यापूर्वी त्यांनी ७ जुलै २०२६ रोजी यासंदर्भात लेखी तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाकडून आजतागायत त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने त्यांनी पुन्हा स्मरण पत्र देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
 या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन दोषी संबंधित अधिकाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करावी आणि त्याचा अहवाल लेखी स्वरूपात द्यावा, अशी आग्रही मागणी खोमणे यांनी पत्राद्वारे केली आहे.
 कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन' छेडणार! 
 प्रशासकीय पातळीवर योग्य सुधारणा व्हाव्यात आणि महापुरुषांच्या जयंती व त्यांच्या सन्मानाला धक्का पोहचू नये, यासाठी हा लढा सुरू करण्यात आला आहे. प्रशासनाने या पत्राची दखल घेऊन पुढील कालावधीत दोषींवर ठोस कारवाई केली नाही, तर तीव्र स्वरूपाचे त्रीव्र आंदोलन' छेडले जाईल, असा इशारा कोराळे खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुरज खोमणे यांनी दिला आहे.
To Top