सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सासवड : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुरंदर तालुक्यातील नागरिकांसाठी मोफत भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन लोकनेते स्व.अजितदादा पवार आरोग्य विषयक बाबतीत नेहमी सतर्क असायचे. त्यांनी तळागाळातील नागरिकांची आरोग्य कक्ष उभारून काळजी घेतली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांसाठी आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.
पुरंदर तालुक्यातील नागरिकांसाठी सखी प्रेरणा मंच आणि अमित झेंडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मोफत भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन खळद (ता. पुरंदर ) येथील वृंदावन पॅलेस येथे आयोजित करण्यात आले होते त्यावेळी सुनेत्रा पवार बोलत होत्या.
कार्यक्रमाचे संयोजन पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या रूपालीवहिनी अमोल झेंडे व पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित भाऊसाहेब झेंडे यांनी केले होते.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप, माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, पीडीसीसी बँकेचे चेअरमन प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार संभाजी कुंजीर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष वामनतात्या जगताप ,पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष उत्तम धुमाळ, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती शरद जगताप, पुरंदर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष वंदना जगताप, जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोळे, प्राजक्ता दुर्गाडे, पुरंदर पंचायत समिती उपसभापती प्रवीण जगताप पंचायत समिती सदस्य स्मिता निगडे ,अर्चना कटके मोनिका कांबळे ,पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्ष रेवती कुंजीर, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष अजिंक्य कड पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी अध्यक्ष संदेश पवार आदी उपस्थित होते. महाआरोग्य शिबीरात ३५ हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी पुरंदर तालुक्यातील ८८८० नागरिकांची आरोग्य तपासणी केली.
यावेळी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुरंदर तालुक्यातील वाढती लोकसंख्या तसेच नागरिकांना आरोग्याच्या सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात यासाठी दिवे येथे ससून हॉस्पिटलच्या धर्तीवर १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. या रुग्णालयांमध्ये पुरंदर तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उपचारासाठी पुणे शहराकडे जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होईल. या रुग्णालयाच्या प्रक्रियेसाठी जिल्हा परिषद सदस्या रूपालीवहिनी झेंडे व पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत असे यावेळी सांगण्यात आले
पुणे जिल्हा परिषदेमार्फत नागरिकांसाठी विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवून आरोग्य विभाग सदैव कार्यरत असल्याचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रूपालीवहिनी झेंडे यांनी केले. सूत्रसंचालन उत्तम धुमाळ यांनी केले. आभार प्राजक्ता दुर्गाडे यांनी मानले.
