Bhor Breaking l भोर हादरले! आर्वी फाट्यावर २८ वर्षीय तरुणाचा खून; पाच जणांनी हल्ला करत केला खून

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
भोर : प्रतिनिधी 
  पुणे- सातारा महामार्ग नजीकच्या आर्वी फाट्यावर रविवार दि.६ पहाटेच्या वेळी अज्ञात पाच तरुणांकडून एका तरुणावर हल्ला करून खून केल्याची घटना घडली.घटनेत रांजे ता. भोर येथील तरुण सागर रामचंद्र पालवे (वय -२८) याचा मृत्यू झाला.पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून पुढील कार्यवाही सुरू केली.
     स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आर्वी फाट्यावर रविवारी पहाटे तीनच्या दरम्यान पाच आज्ञातांनी सागर पालवे याच्यावर हल्ला केल्याने सागर गंभीर जखमी होऊन घटनास्थळी मृत पावला.५ संशयित अज्ञात हल्लेखोरांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.पुढील तपास राजगड पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केतन मचले, हवालदार नाना मदने, सागर कोंढाळकर, समीर भालेराव करीत आहेत.
                                           
To Top