सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर : संतोष म्हस्के
आंबाडखिंड घाटात मिनीबस पलटी होऊन अपघात
चालकाच्या सावधानतेमुळे प्रवासी बचावले.
भोर - मांढरदेवी मार्गावरील अंबाडखिंड ता.भोर घाटात मांढरदेवीला देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या २० प्रवाशांची बस वरवडीच्या मोठ्या वळणावर गुरुवार दि.१० रोजी पलटी झाली.दरम्यान अपघातात मिनीबस चडाने मांढरदेवीला जाताना पलटी झाल्याने तसेच चालकाच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला.
भोर- मांढरदेवी मार्गाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने वाहनचालक मागील सहा महिन्यांपासून घाट रस्ता किंवा सपाट रस्ता असो वाहनचालक सुसाट वाहने चालवत असल्याचे चित्र आहे.रस्त्यावरून वाहने सुसाट चालवल्याने सहा महिन्यात अनेकदा छोटे मोठे अपघात घडले आहेत.दरम्यान घाटातील वळणाच्या रस्त्यावर मांढरदेवी वरून येताना वरवडीच्या वळणावर पलटी झाली असती तर ३०० ते ४०० फूट दरीत कोसळून मोठा अपघात झाला असता असे स्थानिकांनी सांगितले.तर सर्व प्रवासी एकाच घरातील म्हसे खुर्द ता. पारनेर येथील असून काही प्रवासी किरकोळ जखमी असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
