Bhor Crime l भोर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घर फोडून दागिने, रोकड व मोबाईलसह सव्वा लाखांचा ऐवज लंपास

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम----- 
भोर : संतोष म्हस्के 
भोर तालुक्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा घरपोडीकडे मोर्चा वळवला असून भोर शहरातील भेलकेवाडी येथील स्वामी समर्थ सदनातील बंद घर फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे सव्वा लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवार दि.२ घडली.याची फिर्याद मिलिंद चिंतामण देशपांडे (रा.भेलकेवाडी) यांनी भोर पोलिसात दिली.
      भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १४ ऑगस्ट ते २ सप्टेंबर याकालावधीत घर बंद असताना चोरट्यांनी स्वामी समर्थ सदनातील मिलिंद देशपांडे यांचे बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटे फोडली.कपाटांमधील १० हजार रुपये रोख रक्कम, दहा ग्रॅमची सोन्याची ३० हजारांची चैन,१२ हजारांचे चांदीचे दागिने, ५० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र तर २० हजारांचे दोन सॅमसंगचे वापरात नसलेले मोबाईल असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

भोर शहरात मागील दोन महिन्यांपूर्वी एकाच सोसायटीतील पाच ते सहा बंद घरे चोरट्यांनी फोडली होती.त्यातून चोरट्यांनी काही वस्तू व रक्कम चोरून नेली होती. त्याचा तपास लागला नसतानाच पुन्हा एकदा भोर शहरात बंद घोरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान शिवापुर आळी येथील चोरट्यांनी दुसरे बंद घर फोडले या चोरट्यांना काहीही सापडले नसल्याने चोरट्यांनी साहित्य अस्ताव्यस्त टाकून पळ काढला.पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली डी.डी.खांडे करीत आहेत.
Tags
To Top