भोर l पुणे जिल्हा बँकेच्या प्रतिनिधी ठरावात संग्राम थोपटेची राहणार सरसी; 'अ' वर्गातील ७५ पैकी ६२ ठरावावर भाजपाचा दावा

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेच्या निवडणुकीसाठी  'अ ' वर्गातून निवडलेल्या मतदार प्रतिनिधीत्व ठराव  सर्वांधिक भारतीय जनता पाटीॕ पक्षाच्या प्रतिनिधीच्या नावाने आले असल्यामुळे माजी आमदार संग्राम थोपटे यांची ' अ ' वर्ग गटाच्या विकास संस्थामध्ये सरसी राहणार असल्याचे चिञ स्पष्ट दिसत आहे. 
      भोर तालुक्यात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थां मधून सहकारी संस्थेच्या मतदार यादीत समावेश होण्यासाठी ठराव प्रक्रिया मंगळवार  दि.२२ रोजी या शेवटच्या दिवशी एकूण २०२ संस्था पैकी १५६ संस्थाचे प्रतिनिधी ठराव पुणे जिल्हा मध्यवर्ती  बँकेच्या निवडणूकीच्या प्रक्रियासाठी प्राप्त झाले असल्याची माहिती सहाय्यक निबंधक आदिनाथ पालवे यांनी दिली.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक मर्या पुणे या बॅंकेच्या सन २०२६/२०३१ या पाच वर्षाकरिता संचालक मंडळाच्या होणा-या निवडणूकीसाठी उमेदवार,मतदार,सूचक व अनुमोदक होणेसाठी प्रतिनिधीस अधिकार देणे करिता भोर तालुक्यातील जिल्हा बँकेच्या संस्था सभासदांमधुन एकूण २०२ संस्थेंपैकी १५६ संस्थेचे प्रतिनिधींचे ठराव प्राप्त झाले आहेत. यामध्ये 'अ ' वर्गातील ७५ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थापैकी ७४ संस्थांनी ठराव दिले असून वाठार हिंगे यांचा ठराव आलेला नसून आपटी विकास संस्थेचे दोन प्रतिनिधीचे ठराव 'अ ' गटातून आले आहेत. तर 'ब 'वर्गातील कृषी पणन संस्था शेतीमाल प्रक्रिया,खरेदी विक्री संघ सहकारी साखर कारखाने यामधील ३ पैकी २,'क ' वर्गातील नागरी सहकारी बँका व पतसंस्था यामधून ३३ पैकी २५ तर 'ड 'वर्गातील ग्राहक संस्था पाणी पुरवठा,गृहनिर्माण औद्योगिक,प्रक्रिया औद्योगिक उत्पादन संस्था,पगारदार नोकरांच्या संस्था सर्वसाधारण संस्था,दूध संस्था,कुकुटपालन,शेळी मेंढी पालन प्रतिनिधी व व्यक्ती संस्थां ७० पैकी ५५ संस्थेच्या संचालक मंडळांनी आपले प्रतिनिधीचे ठराव आले आहेत. 
       तालुक्यात संस्था प्रतिनिधी म्हणून ठराव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच झाली असल्याचे चित्र पहावयास मिळाले.मागील तीस वर्षापासून माजी मंत्री अनंतराव थोपटे व माजी आमदार संग्राम थोपटे यांचे वर्चस्व असून संग्राम थोपटे पुन्हा चौथ्यांदा रिंगणात आहेत.काही ठिकाणी संचालक मंडळातील प्रतिनिधी देताना कार्यालयीन निवडणूक घेण्यात आली तर काही ठिकाणी बिनविरोध ठराव प्राप्त झाले असून काही संस्थांमधून दोन गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना शेतकरी सभासद , संचालका यांच्यामधून दोन ठराव प्राप्त  झाले आहेत.काही ठिकाणी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळातील सभासदांना पळवा पळवीचे प्रकार घडले होते. २२ सप्टेंबर ही  ठराव देण्याची मुदत शेवट असल्यामुळे बहुतेक संस्थाचे ठराव सहाय्यक निबंधक कार्यालयात प्राप्त झाले  असल्याचे निबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.७५ विविध कार्यकारी विकास सेवा सहकारी संस्था पैकी ७४ प्रतिनिधित्व ठराव झाले असून यामध्ये ६२ ठरावावर भारतीय जनता पाटीॕच्या मतदार प्रतिनिधीच्या दावा केला असल्यामुळे  माजी आमदार संग्राम थोपटे यांचे वर्चस्व राहणार असल्याचे चिञ दिसत आहे. दिवंगत माजी आमदार संपतराव जेधे व सोनबा खोपडे यांचा काही काळ वगळता दिवंगत माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे जिल्हा बँकेवर वर्चस्व होते. राष्ट्रवादीचे भालचंद्र जगताप हे मागील दहा वर्षा पासून जिल्हा बँकेवर संचालक म्हणून काम करत आहेत.तर मागील पंधरा वर्षापासून माजी आमदार संग्राम थोपटे यांचे जिल्हा बँकेत संचालक म्हणून काम करत असून यावेळी पुन्हा चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात असल्याने अधिकाधिक ठराव आपल्या बाजूने करून घेण्यासाठी भारतीय जनता पाटीॕने मोठी ताकद पणाला लावली होती.
To Top