सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे पोलीस स्टेशन हद्दीत वाहतुक नियमांचे उल्लंघन करणा-या १२५ वाहन चालकांकडुन सुमारे एक लाख ४ हजारांचा दंड वसुल करण्यात आला असल्याची माहिती सुपे पोलिसांनी दिली. गणेशोत्सव कालावधीमध्ये वाहतुक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस निरिक्षक शशिकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक पोलीस अंमलदार व होमगार्ड यांच्या पथकाने कारवाई केली. यावेळी रॅश ड्रायव्हिंग, ब्लॅक फिल्मींग, विना परवाना वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, सिटबेल्ट न लावणे, अतिरिक्त प्रवासी वाहतुक, धोकायदायकरित्या मालाची वाहतुक करणे, ट्रीपल सिट तसेच हेल्मेट न घालता दुचाकी चालविणे आदी वाहतुक नियमभंग करणाऱ्या सुमारे १२५ जणांवर कारवाई करण्यात आली. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी यापुढे वाहतुक नियमांचे उल्लंघन करणा-यांविरूद्ध सातत्याने कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शशिकांत शेळके यांनी सांगीतले.
..................................
