सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मेढा : सोमनाथ साखरे
कुडाळ ता.जावली येथे जिल्हा पोलीस अधिक्षक व मेढा पोलीस ठाणे यांनी बंदी घातलेल्या साऊंड सिस्टीमचा वापर गणेश मिरवणूकी मध्ये केल्याने राजमुद्रा गणेश मंडळ यांचेवर यांचेवर सुरज वाघमळे व श्री गणेश मित्र मंडळ यांचेवर ओंकार दिक्षित यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत.
तालुक्यात गावोगावी गणेशाचे आगमण उत्साहात सुरु असताना कुडाळ गावामध्ये ( दि. १४ रोजी ) ग्रामपंचायतीचे समोर राजमुद्रा गणेश मंडळाने साऊंड सिस्टीमचा वापर केल्याने मंडळाचे अध्यक्ष राजेश हणमंतराव शिंदे रा. कुडाळ, श्री दत्त ऑडीओ साउन्ड सिस्टीमचे मालक अनिकेत गणेश शिर्के वय 27 वर्षे रा. म्हसवे, साउन्ड सिस्टीम ऑपरेटर आर्यन रमेश जाधव रा. पुसेगाव, ए.एस लाईटस पुसेगाव निहाल नवनाथ लेंबे वय 30 वर्षे, रा. पिंपोडे बु ता. कोरेगाव यांचे विरोधात पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली.
तसेच ग्रामपंचायत कुडाळचे समोर ( दि. १४ रोजी ) श्री गणेश मित्र मंडळ कुडाळ मंडळाचे अध्यक्ष विरेंद्र सुरेशराव शिंदे रा. कुडाळ, साई-71 प्लस साउन्ड सिस्टीमचे मालक सागर अजित वाडेकर रा. खवलवाडी पो. औंध, ता. खटाव, साउन्ड सिस्टीम ऑपरेटर सुरज सागर शिंदे रा. चंदननगर कोडोलीसातारा, विरा लाईटस पुसेगाव यांचे तेजस भिमराव येवले रा. पुसेसावळी, ता. खटाव तसेच चारचाकी वाहन क्र.एम.एच.04 ई.एल.8809 याचेवर संगनमत करून गणपती आगमण मिरवणुकीत बीम लाईट लावुन कायदयाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
------------------------------
सार्वजनिक ठिकाणी मा. पोलीस अधिक्षक सो, सातारा यांचे आदेश क्र. जीवीशा 7/गणेशोत्सव/बी.एन.एस.एस. 163/लेझर बंदी आदेश/2026-7122 सातारा दि. 03/09/2026 प्रमाणे बी.एन.एस.एस. 163 चे आदेशाचे आणि मेढा पोलीस ठाणे यांचेकडील जावक क्र.4183/2026 दि. 08/09/2026 अन्वये बी.एन.एस.एस. कलम 168 प्रमाणे नोटीसचे सर्व मंडळांनी पालन करावे. जी मंडळे उल्लंघन करतील त्यांचे वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल
सुधीर पाटील
सहाय्यक पोलीस निरीक्षक
