सोमेश्वर रिपोर्टर टीम----
खंडाळा : प्रतिनिधी
गणेशोत्सव सन 2026 हा सोमवार दि.14 सप्टेंबर ते शुक्रवार 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे.या पार्श्वभूमीवर शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे,सार्वजनिक शांतता कायम ठेवणे आणि गणेशोत्सव शांततेत पार पाडणे यासाठी खंडाळा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आले असून ३४ व्यक्तीविरुद्ध कारवाई करीत गणेशोत्सव काळात हद्दपार करण्यात आले आहे.याबाबत शिरवळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी दाखल केलेल्या प्रस्तावावर खंडाळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रविराज जाधव यांनी आदेश जारी केला आहे. व्यक्तींच्या हालचाली,उपस्थिती अथवा कृतीमुळे सार्वजनिक शांततेचा भंग होऊन दखलपात्र गंभीर अपराध घडण्याची तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नमूद करीत शिरवळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी शिरवळ पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर असणाऱ्या ३४ व्यक्तींना गणेशोत्सव काळात हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव खंडाळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रविराज जाधव यांच्याकडे दाखल केला होता.त्यानुसार तहसीलदार रविराज जाधव यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 मधील कलम 163(2) अन्वये संबंधित व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.यामध्ये बेकायदेशीर हत्यार वापरणे,दुखापत करणे,गंभीर दुखापत करणे,धमकी देणे,मारहाण करणे,बेकायदेशीर घरात घुसणे,मालमत्तेचे नुकसान करणे,शिवीगाळ,चोरी,दंगा, हल्ला,दरोड्याची तयारी,जबरी चोरी,जबरी चोरीसह दुखापत, जातीवाचक भाष्य,खुनाचा प्रयत्न आणि बेकायदेशीर अतिक्रमण यांसारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे यामध्ये रितेश दिलीप किर्वे,मनोज पांडुरंग पवार,अनिकेत राजेंद्र कांबळे,अनिल उर्फ पाप्या शामराव वाडेकर,सोमनाथ उर्फ माऊली शंकर राऊत,सुनिकेत संतोष माने,पारस विश्वास भोसले,बाळा भानुदास मंजुळे,रियाज उर्फ मिन्या इकबाल शेख,अय्याज इकबाल शेख,ओंकार राजेंद्र कांबळे,अविष्कार विलास कांबळे,अर्जुन उर्फ अविनाश सतीश पिसाळ,ओंकार दत्तात्रय क्षिरसागर,शुभम उर्फ सोन्या रमेश पंडित,शाहरुख ईस्माईल पठाण,विजय उर्फ शामा बापू पाचे,योगेश गुलाब शिवतरे,वैभव राजू भरगुडे,वेदांत जितेंद्र जाधव,रॉकी हरिदास बाला,करण दत्तात्रय महांगरे,विशाल शेखर वाडेकर,रामा दादा मंडलिक,हृषीकेश उर्फ लंब्या विजय रणवरे,अहमद रजा अमीर भालदार,यश विलास कबुले,अजिंक्य उर्फ पप्पू अलबत कांबळे,इम्रान उर्फ पप्पू कलाम काझी,शेखर शिवाजी नेवसे,रोहित सुभाष सुर्वे,पंकज मोहन वीर,योगेश धर्मराज बामणे यांच्याविरुद्ध खंडाळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रविराज जाधव यांनी आदेश जारी केला आहे.या शिरवळ पोलीसांच्या धडक कारवाईमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे.
