इंदापूर l सीसीटीव्ही अन् गोपनीय माहितीच्या आधारे हिट अँड रनचा तपास; भिगवण पोलिसांचे यश

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
​भिगवण : प्रतिनिधी
बारामती-भिगवण राज्य मार्गावरील शेटफळ गडे गावच्या हद्दीत रविवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघात प्रकरणाचा छडा लावण्यात भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोमनाथ शेंडगे आणि त्यांच्या तपास पथकाला यश आले आहे. बुलेटला धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा अवघ्या काही दिवसात शोध घेत भिगवण पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

​रविवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास कोठारी फार्मजवळ झालेल्या या अपघातात साहिल प्रवीण भोसले (वय २५, रा. उद्धट) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अपघात इतका भीषण होता की, साहिलचा जागीच जीव गमावावा लागला होता. या घटनेनंतर धडक देणारे चारचाकी वाहन चालक वाहनासह पसार झाला होता.
​घटनेचे गांभीर्य ओळखून भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शेंडगे यांनी पथक नेमून तातडीने तपासाची चक्रे फिरवली. अपघातस्थळाची पाहणी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कसून शोध मोहीम राबवली. अखेर पोलिसांच्या तपासाला यश आले असून, अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन पोलिसांनी शोधून ताब्यात घेतले आहे.
​वर्षभरापूर्वीच आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या साहिलचा या अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती. अशा संवेदनशील प्रकरणात भिगवण पोलिसांनी तपास करत दाखवलेली तत्परता आणि धडक कारवाईमुळे नागरिकांमधून पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे कौतुक होत आहे.
​याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाई व गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.
To Top