सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुरंदर l पंढरीनाथ शिंदे
पुरंदर तालुक्यातील जेजुरी-कोळविहिरे-निरा रस्त्यावर आज पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. रस्त्यातील खड्डे चुकविण्याचा नादात झालेल्या या भिषण अपघातात एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली.असून महिलेला तातडीने रुग्णालयात हलविण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी रुग्णवाहिका बोलवली खरी परंतु जखमी महिलेला रुग्णालयात घेऊन जात असताना रुग्णवाहिकेचे चाकच खड्ड्यात अडकल्याने रुग्णाला तातडीने रुग्णालयात पोचविताना आणखीनच आडथळ्याची भर पडली यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत काम चुकार बांधकाम विभागावर कार्यवाहीची मागणी केली .
यापूर्वीही याच रस्त्यावर मोठ मोठ्या पडलेल्या अनेक खड्ड्यांमुळे मोठमोठे अपघात घडलेले असून एका अपघातात तर स्थानिक युवकाचा जीव जाता जाता वाचला .
सोमेश्वर रिपोर्टरने मागील महिन्यात या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याच्या झालेल्या दयनीय अवस्थेबद्दल वस्तूस्थिती मांडली होती परंतु तरीही सुस्त व निर्डावलेला बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून बांधकाम विभाग एखाद्याचा बळी जाण्याची वाट पाहतोय का ? असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थ विचारात असून ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
बांधकाम विभागाने आता तरी त्वरित या रस्त्याची पाहणी करून तातडीने खड्डे बुजवावेत व हा रस्ता दळवळणा योग्य करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत . अन्यथा भविष्यात एखादा मोठा अपघात होऊन विनाकारण कोणाचा बळी गेल्यास संबंधित बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा
संतप्त नागरिक देत आहेत.
