सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : सोमनाथ साखरे
जंगल मे घुमते हो तो जंगल खामोश है ऐसा मत समझो की शेर नाहीये, हो सकता है शेर सो रहा है अशी डॉयलॉगबाजी करीत जरा जपून रावा, उगाच डिवचायचं, काटक घालायचं काम करू नका तुम्हाला ते परवडणार नाही हे अगदी ठामपणे सांगतो अशा शब्दात विरोधकांचा समाचार घेताना बांधकाम मंत्री तथा लातुरचे पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंहराजेभोसले ईशारा दिला.
मेढा येथे भाजपाच्यावतीने विकासाची दही हंडीच्या आयोजित कार्यक्रमात ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. यावेळी कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, डीसीसी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, पंचायत समिती सभापती सौरभ शिंदे, उपसभापती गोरख महाडिक, नगराध्यक्षा सौ.रूपालीताई वारागडे, उपनगराध्यक्ष विकास देशपांडे, बांधकाम सभापती शिवाजी देशमुख, आरोग्य सभापती नितीन मगरे, महिला बालकल्याण सभापती आनंदीताई करंजेकर, नगरसेवक शिवाजी गोरे, रिकी तिवाटणे, सुशांत कांबळे, धनंजय पवार, नगरसेविका सुनीता तांबे, तेजस्वी इगावे, अनघा करंजेकर, पुष्पा मुकणे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देशपांडे, माजी जिप सदस्य दत्तात्रय पवार, तालुकाध्यक्ष संदीप परमने, मारुती चिकने, युवा नेते संतोष वारागडे आदी उपस्थित होते.
ना. भोसले पुढे म्हणाले, आम्हाला कोणी कमी लेखण्याचे काम करू नका आणि बाहेरून येऊन कोणी आम्हाला शिकवायचा प्रयत्न करत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याची ताकद आमच्यात आहे अशा कडक शब्दात त्यांनी सांगुन एक निवडणूक थोड फार वर खाली झाली म्हणून तुम्ही रान मारलं असं समजू नका. आम्ही अजून मैदानात आहे. घोडं मैदान लांब नाही असे सांगुन पुढे म्हणाले ज्यावेळी दोन हात करण्याची वेळ येईल दोन हात काय पण चार हात करू लक्षात ठेवा असा सज्जड दमच ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांना दिला.
यावेळी बोलताना ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले माझं गाणं वाजू नका मी सातारा जावलीच आहे येथील आयाबहिणीच्या, वडीलधाऱ्या मंडळींच्या मनामध्ये कायम आहे त्यामुळे दहीहंडीची गाणी वाजवा असे सांगुन प्रति वर्षी दहीहंडीची परंपरा राखण्याचं काम दक्षिण जावली, जवळवाडी, मेढा यांनी केल आहे. सातारा जिल्ह्यात विकासाची हंडी उंच गेली पाहीजे. जावली तालुक्याच्या विकासाची हंडी पर्यंत कोणी पोहोचता कामा नये असे सांगायलाही ना. भोसले विसरले नाहीत.
यावेळी फाउंड्री पिक्चर अभिनेत्री राजेश्वरी उर्फ शालू आणि रिलस्टार अभिनेत्री गाऊ खुडे यांचेही विशेष आकर्षण होते. यावेळी आदरणीय महाराजसाहेब यांनी सुद्धा गोविंदांमध्ये सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केला मेढा नगरीत प्रथमच नामदार छत्रपती बाबाराजे महा दहीहंडी सोहळ्यासाठी विविध ठिकाणातून 12 दहीहंडी गोविंदा पथक सहभागी झाले होते. या सर्वांनी मोठ्या उत्साहात पाच सहा, पाच सहा थर लावून सलामी दिली. मानाची दहीहंडी फोडण्यासाठी सर्व पथकांमधून चिट्ट्या टाकण्यात आल्या. यावेळी बाबाराजे यांनी एक चिठ्ठी काढली त्याचा मान ईच्छापूर्ती गोविंदा पथक गांधीनगर मेढा यांना मिळाला. मानाची दहीहंडी त्यांनी फोडली तर महिलांची मानाची दहीहंडी श्रीकृष्ण गोविंद पथक मेढा यांनी फोडली व स्टेजवरील दहीहंडी फोडून आदरणीय बाबाराजे यांनी आनंद घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्यानाठी नगरपंचायततीसह भाजपचे कार्यकर्ते किरण ढेबे, दत्ता वारागडे, चंद्रकांत दळवी, गणेश खताळ, समीर पवार, संकेत करंजेकर, अक्षय करंजेकर, गणेश ताटे, अरुणबापू जवळ, सोमनाथ देशमुख, संजय सपकाळ, संतोष करंजेकर, निखिल ओतारी, रोहित देशमुख आदींनी परिश्रम घेतले. यावेळी मेढातील युवक युवती महिला तरुण वर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सामील झाला होता.
