Baramati Crime l अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार ! फरार आरोपीस सोलापूर जिल्ह्यातून अटक; वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई

सोमेश्वर रिपोर्टर live

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या गणेश रामदास मदने (रा. कोहाळे खुर्द, ता. बारामती, जि. पुणे) यास वडगाव निंबाळकर पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथून ताब्यात घेतले आहे.
           सदर आरोपीविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील फिर्यादी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपीने तिला लग्नाचे खोटे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच फिर्यादीचे फोटो व्हायरल करण्याची व तिला जीवे मारण्याची धमकी देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद आहे. सदर गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता.
फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते. दरम्यान, आरोपी धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचून त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. या कारवाईमुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अझर मुलाणी,स. फौ. पन्हाळे,पोलीस हवालदार अनिल खेडकर, कल्याण खांडेकर, भागवत पाटील, सागर चौधरी, भाऊसाहेब मारकड, शशिकांत दळवी, अशोक शिंदे, संदीप गायकवाड तसेच पोलीस शिपाई आबा जाधव,नरेंद्र यादव, सुरज धोत्रे, सचिन घाडगे,सुरज पवार, नागनाथ परगे व विकास येटाळे यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुलाणी हे करत आहेत
To Top