Baramati News | निंबुतमध्ये हातभट्टीची दारू विक्रीप्रकरणी दोन महिलांना अटक; येरवडा कारागृहात रवानगी


सोमेश्वर रिपोर्टर टीम----

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 

बारामती : हातभट्टीची दारू विक्री केल्याप्रकरणी निंबुत (ता. बारामती) येथील दोन महिलांविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिसांनी कारवाई केली आहे. कोमल प्रमोद नवले आणि जयश्री प्रकाश नवले (दोघी रा. निंबुत, ता. बारामती, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. पोलिसांनी दोघींना अटक करून येरवडा कारागृहात पाठविले आहे.

ही कारवाई २६ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली. याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १२३ आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार ग्रेड पोलीस उपनिरीक्षक दीपक वारुळे, पोलीस शिपाई निलेश जाधव, नागनाथ परगे, आरती तोडेकर आणि विकास येटाळे यांनी ही कारवाई केली.


हातभट्टीच्या दारू विक्रीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात चर्चा सुरू आहे.

To Top