सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मेढा : सोमनाथ साखरे
सातारा जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले असतानाही आदेशाचा भंग करून जिल्ह्यात प्रवेश केल्याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एस एस सी नंबर 45/2022 गु.र. नंबर 226 / 2020 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम 142 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी दीपक शामराव वारागडे (वय 45) रा. कुडाळ तालुका जावली यास येथील न्यायालयाने सहा महिने कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त पंधरा दिवसांच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. या प्रकरणातील आरोपी दीपक वाराकडे यास पोलीस अधीक्षक साताऱ्यांच्याकडील आदेशानुसार एक वर्षाकरिता सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.
मात्र दि. 19 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी आरोपी कुडाळ हद्दीतील वारागडे आळी येथे आढळून आल्याने त्याने हद्दपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास मेढा पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी एस आर ओवाळ यांनी केला
या प्रकरणाची सुनावणी मेढा न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायाधीश न्याय दंडाधिकारी डॉक्टर विक्रम आव्हाड यांच्यासमोर झाली या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे श्रीनिवास कणस यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून एस एस मोरे यांनी कामकाज पाहिले.




