सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मेढा l सोमनाथ साखरे
मोहाट ता. जावली येथिल मनीष विजय धनावडे याची महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात निवड करण्यात आली असून मनीषच्या निवडीमुळे तरुण मुलांमध्ये नवचैत्यन्य निर्माण झाले आहे.
मोहाट गावचा मनीष धनावडे हा कोपरखैराणे ( वाशी ) येथिल रा. फ. नाईक विद्यालयात शिक्षण घेत असून इयत्ता पाचवी पासून तो ग्रिफिन जिमखाना मध्ये कबड्डी सराव करीत होता. सन २०२४ / २५ मध्ये ६८ व्या राष्ट्रीय शालेय खेळामध्ये बिहार मधिल नरसिंहपूर येथे सहभाग नोंदवला होता. तसेच ५२ वी कुमार गर राष्ट्रीय अजिंकय कबड्डी स्पर्धा २०२५ / २६ मध्ये महाराष्ट्र कुमार गट मुले कबड्डी संघ अंडर १९ पाटणा, बिहार येथेही सहभाग घेतला होता.
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मणिषने महाराष्ट्र राज्य कबड्डी संघामध्ये आपले स्थान निर्माण केले. मनीषच्या या यशामुळे जावली तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.




