सोमेश्वर रिपोर्टर टीम----
इचलकरंजी | प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे पत्नीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील भांडणानंतर पहाटेच्या सुमारास पत्नीने पतीच्या डोक्यात वरवंटा घालून त्याची हत्या केल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सागर बुरसे असे मृत पतीचे नाव असून, वैशाली सागर बुरसे असे आरोपी पत्नीचे नाव आहे. पती-पत्नीमध्ये काही काळ वाद असल्याने ते विभक्त राहत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ते पुन्हा एकत्र राहत असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पहाटे घरात झालेल्या वादानंतर वैशाली हिने पती सागर याच्या डोक्यात वरवंटा घातल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात सागर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वैशाली ही आपल्या मुलीला घेऊन स्वतःहून पोलीस ठाण्यात दाखल झाली.
या घटनेप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, हत्येमागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे.




