सोमेश्वर रिपोर्टर टीम----
भोर ; संतोष म्हस्के
वेळवंड खोऱ्यातील कोंडगाव - सांगवी ता.भोर गावांच्या हद्दीवर एका अनोळखी तरुणाचा मृतदेह रविवार दि.२९ दुपारच्या दरम्यान सांगवी गावाकडे जाताना स्थानिकांना आढळला.स्थानिकांनी तात्काळ भोर पोलिसांना माहिती दिल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
कोंडगाव - सांगवी गावांच्या दोन्हीबाजूने जंगल परिसर असून पुढील भागातील गावाकडे जाणारा रस्ता पूर्णता जंगलातून गेलेला आहे.दरम्यान सांगवीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला तरुणाचा मृतदेह स्थानिकांना आढळून आल्याने स्थानिकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण होते.स्थानिकांनी काही वेळानंतर भोर पोलिसांशी संपर्क करून घटनेची माहिती दिली.भोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पुढील तपास सुरू केला आहे.मात्र या घटनेमुळे कोंडगाव -सांगवी परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांसह पोलीस प्रशासनाला खून आहे की अपघात याचा अजूनही उलगडा झालेला नाही.



