एक हात मदतीचा सोशल फाउंडेशन च्या वतीने वन्यप्राण्यांना पाण्याची सोय
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी (ता. बारामती) येथील वनविभागातील वन्यप्राण्यांसाठी सोमेश्वरनगर येथील एक हात मदतीचा सोशल फाऊंडेशनच्या वतीने १० हजार लिटर पाणी सोडण्यात आले.
#जाहिरात
यामुळे ऐन उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची तहान भागण्यास मदत मिळणार आहे. वाघळवाडी गावच्या हद्दीत शेकडो एकरावर वनविभागाचे क्षेत्र आहे. याठिकाणी विविध पक्षी, चिंकारा जातीचे हरीण, ससा, तरस आदी वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. वाढत्या उन्हाने नागरीकांसह पशुपक्षीही हैराण झाले असून पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. काहीवेळा हे प्राणी पाण्यासाठी मानवी वस्तीत प्रवेश करतात. हे पाणी सोडल्याने पुढील पंधरा दिवसांसाठी वन्यप्राण्यांची तहान भागणार आहे. वन्यप्राण्यांची काळजी घेण्यासाठी वनपाल पी. एम. रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक योगेश कोकाटे, वनकर्मचारी नंदकुमार गायकवाड, दादा जाधव, नवनाथ रासकर हे प्रयत्नशील आहेत. यावेळी एक हात मदतीचा सोशल फाउंडेशनचे ॲड. नवनाथ भोसले, डॉ. सौरभ काकडे, पत्रकार युवराज खोमणे, दिग्विजय जगताप, गणेश जाधव, मंगेश लकडे, प्रा. रोहित बोत्रे उपस्थित होते.
छायाचित्र : एक हात मदतीचा सोशल फाऊंडेशनच्या वतीने वाघळवाडी वनविभागात पाणी सोडण्यात आले.
COMMENTS