खासदार सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघातील देवस्थान ट्रस्ट च्या प्रतिनिधीशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद

Pune Reporter
खासदार सुप्रिया सुळे यांचा मतदारसंघातील देवस्थान ट्रस्ट च्या प्रतिनिधीशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद

मोरगांव : प्रतिनिधी

 बारामती लोकसभा  मतदार   संघातील  देवस्थान ट्रस्टच्या प्रतीनिधींशी  व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे  खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संपर्क साधला .  कोरोना व लॉक डाऊन  काळात देवस्थान ट्रस्टला येणाऱ्या अडचणीवर चर्चा झाली. तसेच  आगामी काळात ट्रस्टच्या विकासासंदर्भात आपण ठामपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले .  देवस्थान ट्रस्टच्या  धार्मिक बरोबर  सामाजिक कामाचे  त्यांनी कौतुक केले .  
#जाहिरात
       आज झालेल्या  व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये  बारामती तालुक्यातील मोरगांव  ,सोमेश्वर ,  ख्वाजा शाहमन्सुर  दर्गा , इंदापूर नीरा नरसिंगपूर देवस्थान ट्रस्ट ,  पुरंदर तालुक्यातील जेजुरी , नारायणपूर ,भुलेश्वर, सिद्धेश्वर  , भोर तालुक्यातील बनेश्वर , वेल्हा तालुक्यातील मेंगाई देवी  ,मुळशी तालुक्यातील खारवडे म्हसोबा देवस्थान , दौंड तालुक्यातील  केडगांव -  बोरमल नाथ देवस्थान येथील ट्रस्टच्या प्रतीनिधींशी सुळे बोलल्या. मतदार संघातील काही देवस्थानमध्ये गो शाळा आहेत . सध्याच्या परीस्थितीत गोशाळा चालवणे अवघड बनले असल्याने  चाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी देवस्थान प्रतीनिधींस दिले .हिंदू ट्रस्टबरोबर मुस्लिम ट्रस्ट  खेड शिवापुर येथील कमर अली दरवेश ट्रस्ट प्रतिनिधीशी त्या बोलल्या .
        मोरगांव येथील चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी  देवस्थान ट्रस्टने ससुन सर्वोपचार रुग्णालयास दिलेल्या  २१ लाख  रुपये देणगी , ग्रामस्थांना  दिलेल्या अन्नधान्य किटबाबत  माहीती दिली असुन मोरगांव येथील छोट्या व्यवसाईकांना मदत देण्याबाबतची मागणी केली .
        तसेच कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  देवस्थान प्रतीनिधींनी बोलताना सांगितले की देवस्थानच्या आवारात थुंकल्यास पाचशे रुपयांचा  दंड आकारण्यास सुरुवात केली असुन  तथा आशयाच्या पाट्या लावल्या असल्याची असल्याचे सांगितले यामुळे सुळे यांनी देवस्थानचे कौतुक व आभार मानले .
To Top