दोन गुन्ह्यात पाच जणांना अटक ८० हजाराचा माल जप्त
वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
एक म्हैस आणि दोन गाई चोरणाऱ्या दोन गुन्ह्यातील पाच आरोपीना वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी अमर सोमनाथ चव्हाण रा वडगाव निंबाळकर, सनी दत्तू जाधव रा खंडाज ता बारामती, प्रशांत राजेंद्र मदने रा वडगाव निंबाळकर, नासिर बाबूलाल कुरेशी रा फलटण रोड बारामती, बंदेनवाज हसन शेख रा मळद बारामती अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून २५ हजार रुपये किंमतीची एक म्हैस आणि दुसऱ्या गुन्ह्यात ५५ हजाराच्या २ गाई असा ८० हजाराचा माल जप्त करण्यात आला आहे.
वरील कारवाई पोलीस अधिक्षक संदीप पाटील , अप्पर पोलीस अधिक्षक बारामती, जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सपोनि सोमनाथ लांडे व स्टाफने केली.
#जाहिरात
COMMENTS