करंजेपूल आणि वाणेवाडी येथील कॉम्प्लेस मधील दुकाने बंद करण्याची मागणी

Pune Reporter
करंजेपूल आणी वाणेवाडी येथील कॉम्प्लेस मधील दुकाने बंद करण्याची मागणी

सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

करंजेपुल आणी वाणेवाडी येथील मुख्य चौकातील कॉम्प्लेस मधील दुकानांमध्ये जास्त गर्दी होत असल्याने या ठिकानावरील दुकाने बंद ठेवावीत अशी मागणी होऊ लागली आहे. 
#जाहिरात
       चार दिवसापूर्वी पोलीस, पत्रकार आणि ग्रामस्थ यांच्या बैठकीत सोमेश्वरनगर परिसरातील दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती तर करंजेपुल आणि वाणेवाडी येथील कॉम्प्लेस मधील  दुकाने एका आडएक चालू करण्यास परवानगी देण्यात आली होती मात्र काही व्यावसायिक निर्णयाचे पालन करत नसल्याने या ठिकाणी गर्दीचे लोंढे दिसत आहेत. करंजेपुल या ठिकाणी अमित यांची दोन कापड दुकान असून या ठिकाणी बाहेरील गावावरून लोक कपडे खरेदीसाठी येत असल्याने या कापड दुकानात लोकांची गर्दी दिसत आहे. तसेच दुकानात तीनच लोक असावेत असे असतानाही या दुकांनात १५ ते २० कामगारच आहेत तसेच खरेदीसाठी येणारे ग्राहक वेगळे त्यामुळे अमित कापड दुकानाकडून सोशल डिस्टन्स पळाले जात नसून गर्दी ही जास्त प्रमाणात आहे.
To Top