नीरा खोऱ्यात समाधानकारक पाऊस : शेतकरी सुखावला
पुरंदर : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, तर सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांची जिवनदायनी असलेली नीरा नदी व नदीवरील धरणांची आजची स्थीती समाधानकारक आहे. गेल्या वर्षी जूनच्या सुरवातीलाच नीरेच्या खोऱ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. मागील दोन दिवसांपासून यामध्ये खो-या पाऊस पडू लागला आहे. आज २६ जून पहाटे पासून पावसाने जोरात बॅटिंग केली आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी वाढत आहे. तर समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी सुखावला आहे.
आज नीरा खोऱ्यातील पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये पडलेल्या पाऊस मिलिमीटरमध्ये खालील प्रमाणे.
पाऊस (26/6/20)
पुणे पाटबंधारे विभाग पुणे
निरा डावा कालवा
भाटघर. = 8.
निरादेवघर. = 9.
विर. = 18.
गुंजवणी. = 2.
पिंपरा. = 33.
वडगाव. = 64.
मा.वस्ती. = 106.
पणदरे.बं = 90.
माळेगाव कॉ. = 65.
बारामती. = 55.
सनसर. = 36.
अंथुर्णे. = 38.
निमगाव. = 38.
बावडा. = 42
नाझरे. = 14.
आज नीरा खोऱ्यातील सातारा जिल्ह्यातील गावांमध्ये पडलेल्या पाऊस मिलिमीटरमध्ये खालील प्रमाणे.
पाऊस (26/6/20)
निरा उजवा कालवा
विर = 18
फलटण = 27
निंबळक = 52
धर्मपुरी = 82
नातेपुते = 105
माळशिरस = 103
वेळापूर = 44
अकलूज = 92
महळुंग = n. R
भलवीन = 78
पंढरपूर. = 08
COMMENTS