सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

Followers

विशेष माहिती

साडे चार कोटींच्या सिगारेटची चोरी :वडगाव पोलिसात १३ जणांविरोधात गुन्हा ७ जण ताब्यात

साडेचार कोटींच्या सिगारेटची चोरी :  वडगाव पोलिसात १३ जणांविरोधात गुन्हा, ७ जण ताब्यात वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी संतोष भोसले बार...


साडेचार कोटींच्या सिगारेटची चोरी : वडगाव पोलिसात १३ जणांविरोधात गुन्हा, ७ जण ताब्यात

वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
संतोष भोसले

बारामती तालुक्यातील सुपा- मोरगाव मार्गावरून चाललेल्या ट्रकचालकाला शस्त्राचा धाक दाखवत सिगारेटने भरलेला ट्रक पळवून नेल्या प्रकरणी १३ जणांवर वडगाव निंबाळकर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी ७ जण ताब्यात घेतले आहेत. 
       बुधवार ता. २४ रोजी हा प्रकार घडला. याबाबत झाकीर सुकामेव हुसेन ( रा. माचा, ता. किसनगडवास, जि . अलवर, राज्यस्थान) या ट्रक चालकाने फिर्याद दिली.  हुसेन हे कपूर डिझेल गॅरेज प्रा. लि. कंपनीमध्ये आयशर ट्रक (एनएल ०१, एल- ४३३९)  चालवतात  रांजणगाव एमआयडीसीतील आयटीसी सिगारेट कंपनीशी या ट्रान्सपोर्टचा माल वाहतूक करार केला आहे.
 बुधवार ता. २४ रोजी हुसेन यांनी सिगारेटचा माल भरुन ते हुबळीकडे निघाले. न्हावरा, केडगाव वरुन ते सुप्याला येत पुढे मोरगाव बाजूकडे निघाले असताना अन्य एका ट्रकने त्यांना अडवत त्यांच्या ट्रकला आपला ट्रक आडवा घातला. पाचजणानी त्यांच्या ट्रकमध्ये येत शस्त्राचा धाक दाखवत त्यांना बाजूला करत ट्रकचा ताबा घेतला. हुसेन यांचे हातपाय बांधण्यात आले. डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली. दुसऱ्या एका ट्रकमध्ये त्यांना मागील हौदात बसवण्यात आले. माढा तालुक्यात टेंभुर्णीजवळ कंदर या गावी त्यांच्याकडील ३५०० रुपये जबरीने काढून घेत एका मक्याच्या शेतात त्यांना सोडण्यात आले. सुमारे चार ते पाच तास ट्रकमधून त्यांना फिरवले जात होते. 
दरम्यान बुधवारी रात्री पुणे-नगर रस्त्यावर शिरूर जवळ पोलिसांनी थरारक पाठलाग करून ट्रक पकडला अंधाराचा फायदा घेऊन आरोपी उसाच्या शेतात लपून बसले होते यातील सात जणांना गुरुवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडून गजाआड केले यामध्ये शिरूर पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली.
या घटनेत दरोडेखोरांनी ४ कोटी ६१ लाख ८८ हजार ८२० रूपयांच्या  सिगारेटसह  ३ हजार ५०० रूपये रोख आणि १० लाखांचा ट्रक पळवून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान या दरोड्याचा पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत दरोडेखोरांना अटक केली असल्याचे वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी सांगितले. 
सदर गुन्ह्यात १३ जणांवर गुन्हा दाखल केला असून सात जण ताब्यात घेतले आहेत सर्व जण मध्यप्रदेश मधील आहेत. सुशील राजन झाला, मनोज राजाराम सिसोदिया, मनोज केसरसिंग गुडेन, दिनेश वासुदेव झाला, सतीश अंतरसिंग झाला, कल्याणसिंग सदृलसींग चौहान, ओम प्रकाश कृष्णा कृष्णा झाला अशी ताब्यात घेतलेल्या ची नावे नावे आहेत. 
अटक केलेले सात जण आंतरराज्य टोळीतील दरोडेखोर असून त्यांच्याविरुद्ध कर्नाटक पश्चिम बंगाल हरियाणा उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश व ओडिशा या राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केली.
---------------

COMMENTS

test
Name

blogg,2,Breaking News,1063,breaking news is,1,breking news,3,video,1,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,शेती,1,साहित्य,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : साडे चार कोटींच्या सिगारेटची चोरी :वडगाव पोलिसात १३ जणांविरोधात गुन्हा ७ जण ताब्यात
साडे चार कोटींच्या सिगारेटची चोरी :वडगाव पोलिसात १३ जणांविरोधात गुन्हा ७ जण ताब्यात
https://lh3.googleusercontent.com/-QnPNB2Y6yXY/XvWECm8Po4I/AAAAAAAACuE/jyZMoAY-gnwIepoJt79nU3wG9OZuRw_sgCLcBGAsYHQ/s1600/1593148417836137-0.png
https://lh3.googleusercontent.com/-QnPNB2Y6yXY/XvWECm8Po4I/AAAAAAAACuE/jyZMoAY-gnwIepoJt79nU3wG9OZuRw_sgCLcBGAsYHQ/s72-c/1593148417836137-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/06/blog-post_993.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/06/blog-post_993.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy