पुरंदरकरांची चिंता वाढली: सासवड मध्ये आज पुन्हा तीन पॉझिटिव्ह
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील एक व नव्याने दोन व्यक्तींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आज शुक्रवार दि.२६ रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकुण संख्या तीन झाली आहे. सासवडकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सासवड शहर पुढील दोन दिवस संपुर्ण बंद असणार आहे.
सासवड येथील जयप्रकाश चौकातील रुग्णाच्या संपर्कातील एक व्यक्ती व इतर दोन व्यक्तींचे (एकूण तीन) कोरोना अहवाल positive आलेले आहेत अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.
सासवड शहरात पुणे येथुन ये-जा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोक सैरावैरा बेफिकिरीने फिरु लागले. शासनाने सांगितलेले नियम व सावधानता न बाळगल्याने आता सासवड मध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. आज तीन व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आता चिंता वाढली आहे. सासवड मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी पुरंदर तालुक्यातील इतर मोठ्या गावात याची कोणतीच भिंती जाणवत नाही. आजही आठवडे बाजार किंवा बाजारपेठेमध्ये तोबा गर्दी दिसून येत आहे. ही धोक्याची घंटा असल्याचे प्रशासन सांगत आहे पण लोक याकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करत आहेत.
COMMENTS